पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video

 


Bull Attack Viral Video : पिसाळलेल्या बैलांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच दिल्लीतील एका घटनेत पिसाळलेल्या बैलाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचे समोर आले होते, मात्र या घटनेत महिनेने धैर्याने स्वत:चा जीव वाचवला.

 


पण, अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे, ज्यात पिसाळलेला बैल रस्त्यावर धावत जाऊन एका बाईक एजन्सीमध्ये घुसतो, यानंतर तिथल्या लाल रंगाचे शर्ट घातलेल्या एका व्यक्तीवर तो जोरदार हल्ला करतो. शिंगाने त्याला हवेत उचलतो, यानंतर बैलाने जे काही केले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

 


धक्कादायक व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून धावत एक बैल अचानक बाईक एजन्सीमध्ये घुसतो आणि दुसऱ्याच क्षणी लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो. बैलाचा हल्ला इतका भीषण होता की, तिथे उपस्थित असलेले लोकही ते पाहून आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातात. यावेळी पिसाळलेला बैल लाल रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीला शिंगांवर धरून थेट दुकानाच्या आत फरपटत नेतो.

 


त्यानंतर शिंगांनी वर उचलून त्याला आपटणार असतो, पण तो तरुण पळून जातो; अन्यथा बैलाने त्याला बैलाला हात आणि पाय वेगवेगळे असतात का? त्यामुळे हा शब्द नको तुडवलं असतं. यावेळी बैलाने एजन्सीमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस केली, त्यामुळे संपूर्ण शोरूममध्ये गोंधळ उडतो. या घटनेचा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले असून सोशल मीडियावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत Bull Attack Viral Video.

Leave a Comment